Monday , September 21 2026
Breaking News

चोरी आणि दरोड्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी बेळगावमध्ये “लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम” सुरू

Spread the love

 

बेळगाव : चोरी आणि दरोड्यांच्या वाढते प्रकारावर आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी “लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम” नावाची एक नवीन सुरक्षा व्यवस्था सुरू केली आहे.
शहराबाहेर जाणारी कोणतीही व्यक्ती त्यांचा पत्ता, स्थान पिन आणि अनुपस्थितीचा कालावधी शहर पोलिस नियंत्रण कक्षाला दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे पाठवू शकतात. नियंत्रण कक्ष: माहिती व्हाट्सअपद्वारे ८२७७९५११४६ वर पाठवता येईल. डेटा गोपनीय ठेवला जाईल आणि फक्त त्या भागातील बीट स्टाफला रात्रीच्या ड्युटीबद्दल माहिती दिली जाईल.

रात्रीच्यावेळी गस्तीवर असणारे पोलिस रात्री १ ते ५ या वेळेत तुमच्या घरांना किमान दोनदा भेट देतात आणि त्यांची तपासणी करतात. हीच वेळ आहे जेव्हा चोरीच्या घटना घडतात. या संदर्भात, पोलिस बंद घरांवर लक्ष ठेवतात आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी खबरदारी घेतात.

शहरांमध्ये चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस विभागाची ही एक नवीन प्रणाली आहे.

अलिकडच्या काळात बेळगाव जिल्ह्यात चोरी आणि दरोड्याच्या घटना वाढल्यानंतर पोलिस विभागाने “लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम” सुरू केली आहे आणि जनतेला या नवीन सुरक्षा प्रणालीचा चांगला वापर करण्यास सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *