Tuesday , March 3 2026
Breaking News

युवा समिती सीमाभागकडून “बेळगांव वार्ता”चे पत्रकार नरेश पाटील सन्मानित

Spread the love

 

रायगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने बेळगाव सीमाभागातून सुरू होणाऱ्या भव्य ‘मराठी सन्मान यात्रे’च्या पार्श्वभूमीवर रविवार दि. २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनी संध्याकाळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील धर्मशाळेत एक उत्साहपूर्ण सन्मान सोहळा पार पडला.

या सन्मान सोहळ्यात मूळचे संकेश्वर येथील व सध्या माणगाव येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ वृत्तपत्रकार तथा दै. बेळगांव वार्ताचे रायगड जिल्हा प्रतिनिधी नरेश विठ्ठल पाटील यांचा सन्मान करण्यात आला. मराठी अस्मितेच्या लढ्याला बळ देणाऱ्या निर्भीड व निःपक्षपाती पत्रकारितेचा हा सन्मान ठरला.

दै. बेळगांव वार्ता हे केवळ सीमाभागापुरते मर्यादित नसून महाराष्ट्र राज्यातही अत्यंत लोकप्रिय माध्यम म्हणून ओळखले जाते. बेळगाव सीमावादासह सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवरील विश्वसनीय, वृत्तांकन या दैनिकाने सातत्याने केले असून त्यामुळे महाराष्ट्रातील वाचकवर्गातही या वृत्तपत्राला मोठा विश्वास व लोकप्रियता लाभली आहे.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी “मराठी सन्मान यात्रे”साठी ऊर्जा मिळावी, तसेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रायगड किल्ल्याची पवित्र माती संकलित करण्यासाठी दि. २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी रायगड येथे दाखल झाले होते.

या संपूर्ण दौऱ्यादरम्यान मराठी सन्मान यात्रेशी संबंधित सर्व घडामोडींचे सातत्यपूर्ण, वृत्तांकन करणारे पत्रकार म्हणून नरेश पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी नरेश पाटील यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके तसेच कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी नरेश पाटील यांच्या पत्रकारितेचे विशेष कौतुक करताना सांगितले की, त्यांच्या निःपक्षपाती आणि सातत्यपूर्ण लेखणीमुळे बेळगाव सीमावादातील मराठी अस्मितेचा लढा अधिक ठामपणे जनतेसमोर पोहोचत आहे.

या सन्मान सोहळ्याला युवा समिती सीमाभागचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच बेळगाव सीमाभागातून आलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावकडे प्रस्थानपूर्व पार पडलेला हा सन्मान सोहळा मराठी अस्मितेच्या चळवळीत पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
खऱ्या अर्थाने बेळगावच्या मराठी संघर्षाला शब्द देणारे पत्रकार नरेश पाटील यांचा पाचाड येथे झालेला हा सन्मान मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील एक अभिमानास्पद क्षण ठरला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *