Monday , September 21 2026
Breaking News

आनंदनगर रहिवासी संघटना आणि श्री शिवमंदिर विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : आनंदनगर रहिवासी संघटना आणि श्री शिवमंदिर विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे 77 वा प्रजासत्ताक दिन श्री शिव मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. संघटनेचे अध्यक्ष आप्पाजी कुगजी यांच्या हस्ते तिरंग्याचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री. एस. एस. वेसणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले.
बी. एम. पाखरे, पी. ए. पाटील, उदय महागावकर, पी. जे. घाडी, आदींनी आपल्या भाषणात सांगितले की, भारत हा लोकशाहीने चालणारा देश आहे. भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते असे सांगत प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले.
यावेळी प्रदीप मुरकुटे, अशोक मुचंडी, बाळू तम्मुचे, मधुकर सुतार, शंकर नंदी, चंद्रकांत धुडूम, बाळासाहेब पाटील यांच्यासह शिवमंदिर ट्रस्टचे पदाधिकारी रहिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *