Tuesday , March 3 2026
Breaking News

चलवेनहट्टी येथे १ फेब्रुवारी रोजी इंगळ्या उत्सव

Spread the love

 

बेळगाव : चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थानचा इंगळ्या उत्सव कार्यक्रम रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षी रेणूका देवीची यात्रा संपन्न झाल्यानंतर इंगळ्या उत्सव आयोजित केला जातो. यंदाही रविवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४-०० वाजता इंगळ्या उत्सव आयोजित करण्यात आला असून पहाटे देवाच्या अभिषेक होईल. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.
त्यानंतर सायंकाळी प्रदिक्षणासाठी देवांना पालखीतून बाहेर काढले जाणार आहे. यावेळी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. प्रदिक्षणाचा कार्यक्रम आटोपताच देव पुन्हा गादीवर विराजमान होतात‌.
यानंतर नवस फेडण्याऱ्या भाविकांकडून नवस फेडण्यासाठी
श्रीफळाचा वर्षाव केला जातो. यावेळी वर्षाव केलेले श्रीफळ पकडण्यासाठी मोठी झुंबड उडते व हा क्षण पाहण्यासाठी देखील भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
यानंतर मुख्य उत्सवाला म्हणजे इंगळ्याना सुरुवात होते.
अगदी शांत वातावरणात देवाचे गाऱ्हाणे घातले जातात व इंगळ्याना सुरवात होते तरी वरील माहिती प्रमाणे इंगळ्या उत्सव साजरा होणार आहे. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *