Sunday , September 20 2026
Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात, अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू

Spread the love

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डीजीसीएने ही माहिती दिली आहे. या अपघातामध्ये अजित पवार देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. ‘सकाळी ७ वाजता मंत्रालयात हजर होणारा मंत्री’ अशी त्यांची शिस्तबद्ध ओळख होती. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कार्यक्षम प्रशासक आणि जमिनीवरचा नेता गमावला आहे. बारामतीसह संपूर्ण पुण्यात शांतता पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार आणि मुले पार्थ व जय असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार मुंबईहून एका खासगी विमानाने बारामतीकडे येत होते. सकाळी ९:१५ च्या सुमारास धावपट्टीवर उतरत असताना विमानाला आग लागली. स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यांना वाचवता आले नाही.

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी बारामतीकडे प्रस्थान केले आहेत. अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दिल्लीला गेले होते. तात्काळ त्यांनी बारामतीकडे प्रस्थान केले आहे.

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि प्रशासकीय पकडीसाठी ओळखले जात होते. त्यांनी १९८२ मध्ये सहकारी कारखान्यातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले, परंतु काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. १९९१ पासून ते सलग बारामती विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी जलसंपदा, अर्थ, नियोजन आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *