Sunday , September 20 2026
Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात, गंभीर जखमी

Spread the love

 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाला भीषण अपघात झाला.

हा अपघात भीषण स्वरुपाचा होता. हे विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. त्यांच्या विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात अजित पवारांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यासोबत असलेले काही कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही जखमी झाल्याचे बोललं जात आहे. या सर्वांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजित पवार गंभीर जखमी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीसह संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नियोजित सभांच्या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांनी विमानतळ आणि रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. प्रशासनाकडून तूर्तास संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या विमानाच्या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड की अन्य काही कारण याचा तपास करण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून उच्चस्तरीय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *