Tuesday , March 3 2026
Breaking News

जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन (फेडरेशन कर्नाटक )-6 च्या उपाध्यक्षपदी श्रीधन सुरेश मुळीक यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन (फेडरेशन कर्नाटक )-6 च्या उपाध्यक्ष पदी श्रीधन सुरेश मुळीक यांची निवड करण्यात आली.
श्रीधन मुळीक हे शास्त्री नगर येथील प्रतिष्ठित नागरिक आहेत. 2018 ते 2022 या काळात जायंट्स परिवार बेळगांव या ग्रुपचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्या वेळी त्यांची केलेली कामगिरी पाहून त्यांना युनिट-6 च्या डायरेक्टर या पदावर घेण्यात आले. त्या पदावर असते वेळी त्यांना ऐकून 18 अवॉर्ड मिळाले त्या मध्ये बेस्ट आऊटस्टँडिंग ग्रुप अध्यक्ष आणि बेस्ट आऊटस्टँडिंग युनिट डायरेक्ट असे ऐकून 18 अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. सर्व कामाचा अनुभव पाहून या वर्षी कर्नाटक फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. ते एक चांगले व प्रतिष्ठित अभियंता असून त्यांचे शिक्षण बीई सिव्हिल गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि श्री सिद्धिविनायक कंट्रक्शनचे संचालक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी नगरसेवक सुरेश मुळीक यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *