Tuesday , March 3 2026
Breaking News

वाहन दुर्घटनेत कंग्राळी खुर्द येथील जवान जगदीश शिंदे यांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान जगदीश शिंदे यांचा अंबाला (हरियाणा) येथे कर्तव्यावर असताना वाहन दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी घडली.

जवान जगदीश शिंदे हे ज्योती नगर- कंग्राळी खुर्द-बेळगाव येथील रहिवाशी होते. यामुळे त्यांचे पार्थिव बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी बेळगाव ज्योती नगर-कंग्राळी खुर्द या त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जगदीश शिंदे हे अत्यंत कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व देशसेवेसाठी सदैव तत्पर होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कंग्राळी खुर्द गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच आई-वडील असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Spread the love  बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल या ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *