Tuesday , March 3 2026
Breaking News

लोकविश्वासास पात्र ठरलेली नवहिंद सोसायटी : महापौर मंगेश पवार

Spread the love

 

बेळगाव : नवहिंद को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.येळ्ळूर (आंतरराज्य) ता. जि. बेळगाव या संस्थेने चांगला व्यवसाय केलेला असून गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवून लोकविश्वासास पात्र ठरलेली आहे, असे गौरवोदगार महापौर मंगेश पवार यांनी नवहिंद सोसायटीच्या गणेशपूर शाखेच्या स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी काढले.
प्राचार्य श्री. बी. बी. देसाई यांनी सहकार हा उपक्रम समाज परिवर्तनाचा भाग असावा त्यातून समाजाची उन्नती व्हावी नवहिंद सोसायटीने हे कार्य परिणामकारक राबविले आहे असे विचार याप्रसंगी मांडले.
प्राचार्य श्री. आनंद मेणसे म्हणाले, श्रीमंत शाहू महाराज यांनी 1905 मध्ये महात्मा गांधींच्या प्रेरणेने वैकुंठ भाई मेहता यांनी कोल्हापूरला सर्वप्रथम सहकार सुरु केला. त्याचीच प्रेरणा घेऊन देशात सर्व ठिकाणी सहकार पोहचला नवहिंद सोसायटीने पारदर्शक कारभार करून लोकविश्वास संपादन केला आहे असे विचार मांडले.
केदनूर ता. चंदगड येथील सरपंच सौ. संगीता सुरेश घाटगे यांनी आपल्या कठीण काळात नवहिंद सोसायटीने कसे सहकार्य केले याचे विवेचन केले.
सुरवातीला महापौर मंगेश पवार यांच्या शुभहस्ते फित कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री आनंद मेणसे यांनी केले. ई स्टॅम्प प्रणालीचे उद्घाटन प्राचार्य श्री. बी. बी. देसाई यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजी सायनेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्हा. चेअरमन श्री. अनिल हुंदरे यांनी केले. संचालक मंडळाच्या वतीने अतिथींचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे औचित्य साधून गणेशपूर शाखेत 25 महिन्यात दाम सव्वापट योजना जाहीर करण्यात आली
कार्यक्रमात गणेशपूर शाखेतील ग्राहक मदन विजय पाटील,यल्लापा महादेव पाटील, आनंद तेवरे, गोपाळ खादरवाडकर, पुंडलिक देसाई या पाच चांगल्या ग्राहकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष एन. डी. गोरे नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन नारायण जाधव, प्रियदर्शिनी सोसायटीच्या चेअरपर्सन सौ. माधुरी पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास संभाजी कणबरकर, वाय सी गोरल, श्रीधर धामणेकर, नितीन कुगजी, भिमराव पुण्यन्नावर, नीता जाधव, वाय एन पाटील, दशरथ पाटील, आनंद पाटील, आनंद मजूकर, परशराम कंग्राळकर, नारायण बस्तवाडकर, सुरेखा सायनेकर, रूपा धामणेकर, वर्षा अष्टेकर, सी.ई.ओ. एन डी वेर्णेकर, वसुली प्रमुख, जे एस नांदुरकर, मॅनेजर विवेक मोहिते, एम. एन. पाटील, रमाकांत देसाई, जे बी शहापूरकर, सुमेश चौगुले, सागर जाधव, दिनेश पाटील, पुरुषोत्तम कदम, बाबाजी पाटील, महांतेश अलगोंडी, ई. उपस्थित होते. संचालक प्रकाश अष्टेकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *