
बेळगाव : बेळगावजवळील हिंडलगा येथे कट्टर हिंदुत्ववादी हिंदुराष्ट्र सेना आणि श्रीराम सेना कर्नाटक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हळदी-कुंकू आणि भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकुमार कोकीतकर आणि भाग्यश्री कोकीतकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सोहळ्याला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवत हिंदू संस्कृतीचा जागर केला.
२८ जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आर. एम. चौगुले यांनी भूषवले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुत्ववादी नेते धनंजय जाधव, पंडित ओगले, सुशांत हळदकर उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून अनिल महाराज देवळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हिंडलगा परिसरात पाहायला मिळालेला महिलांचा जनसागर. हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत या हळदी-कुंकू समारंभाला हजेरी लावली होती. यावेळी हिंदुराष्ट्र सेना आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले.

Belgaum Varta Belgaum Varta