Monday , September 21 2026
Breaking News

हारुगेरी येथे भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून गजानन वडेयार (२२), महादेव गोलबावी (२२) आणि मलाप्पा गोलबावी (२६) यांचा मृत्यू अशी मृतांची नावे आहेत.

हारुगेरी येथील रहमान धाब्याजवळ मुगलाखोडाकडे दुचाकीवरून तिघेजण जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि पलायन केले.

गजानन आणि महादेव यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या मलाप्पा गोलबावी याचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

हारुगेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *