Sunday , September 20 2026
Breaking News

अळवाण गल्ली सरकारी उर्दू शाळेचा 7 रोजी हीरक महोत्सव

Spread the love

 

बेळगाव : अळवाण गल्ली, शहापूर बेळगाव येथील सरकारी उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र. 6 या शाळेचा हीरक महोत्सव सोहळा येत्या शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

सदर हीरक महोत्सवी सोहळा अळवन गल्ली, शहापूर येथील पंडित नेहरू कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. सोहळ्याच्या उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित राहणार आहेत. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ, बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी रवी भजंत्री, बी.आर.सी. समन्वयक आर. डी. हिरेमठ व बीडीसीसी सरचिटणीस प्रदीप एम. जे. हे हजर राहणार आहेत. तरी शाळेचे विद्यार्थी -विद्यार्थिनी, पालक आणि शिक्षणप्रेमींनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सरकारी उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र. 6 चे मुख्याध्यापक अश्फाक अहमद नरगड्डी व एसडीएमसी चेअरमन अहमद रेश्मी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *