Tuesday , March 3 2026
Breaking News

सिगारेटच्या पैशांवरून बोडकेहट्टी येथील दुकानदाराची निर्घृण हत्या

Spread the love

 

बेळगाव : दारूची नशा आणि एका क्षुल्लक वादाचे पर्यावसान दुकानदाराच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगाव तालुक्यातील बोडकेहट्टी येथे सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून चार तरुणांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून त्यांचा बळी घेतला. बोडकेहट्टी येथील रहिवासी यल्लाप्पा दुर्गप्पा नाईक (४८) असे या दुर्दैवी दुकानदाराचे नाव आहे. मंगळवारी रात्री मोहनगा जत्रा आटोपून दारूच्या नशेत परतत असलेल्या कडोली येथील चार तरुणांनी यल्लाप्पा यांच्या दुकानातून सिगारेट खरेदी केली. त्यानंतर पैशांच्या कारणावरून त्यांनी वाद घालत यल्लाप्पा यांना अमानुष मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या यल्लाप्पा यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत अवघ्या अर्ध्या तासात प्रज्वल पाटील, निखिल चौगुले, विवेक चौगुले आणि श्रीधर पाटील या चार आरोपींना अटक केली. किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत तरुणांची मजल जात असल्याने समाजात चिंता व्यक्त होत आहे. काकती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *