Tuesday , March 3 2026
Breaking News

११ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त; मार्केट पोलिसांची कारवाई

Spread the love

 

बेळगाव : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकांत प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश करत मार्केट पोलिस पथकाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात ११ लाख २५ हजार रुपये किमतीचे ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, दोन महिला संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरती उर्फ परीदा चौगुले (वय २६), सरस्वती रोकडे (वय ४५, दोघे रा. वड्डरवाडी गँगवाडी, बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणातील शिवा चौगुले (रा. गँगवाडी, बेळगाव) पसार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात २०२४ मध्ये चार वेळा चोरी केल्याची कबुली या संशयितांनी दिली आहे. चोरी केलेले सोन्याचे दागिने वितळवून संशयित आरोपी आरती हिचा पती शिवा चौगुले याच्या नावावर रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथील फायनान्समध्ये तारण ठेवून रक्कम उचलल्याचेही उघड झाले.
पोलिस पथकाने फायनान्सची ओळख पटवून पंच आणि सोनारांच्या उपस्थितीत व्यवस्थापकांकडून ७६ ग्रॅम वजनाचे, ११.२५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. अटक केलेल्या दोन आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पसार आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णवर, एएसआय एस. एम. शिंदे, पोलिस एल. एस. कडोलकर, नवीनकुमार ए. बी., विश्वनाथ माळगी, आशिरअहमद जमादार, शंकर कुगटोळी, सुरेश कांबळे, कार्तिक जी. एम., एम. बी. वडेयर, मल्लिकार्जुन गुदगोप, प्रतिभा गिडननवर, निताली कोळी, मोदिना जमालसाबनवर, सावित्री गोडी आणि तांत्रिक विभागातील रमेश अक्की व महादेव काशीद यांचा सहभाग होता.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *