Monday , September 21 2026
Breaking News

मराठा लाईट इन्फन्ट्रीतर्फे मराठा दिवस साजरा

Spread the love

 

बेळगाव : मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर येथे दि. ४ फेब्रुवारी रोजी मराठा दिवस साजरा करण्यात आला. शरकत युद्ध स्मारक येथे मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते येथे युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या योद्ध्यांना शरकत युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली.
४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी मालुसरेनी सिंहगड किल्ला जिंकला होता. मराठा सैन्याने मिळवलेल्या दैदीप्यमान विजयाच्या स्मरणार्थ मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर येथे मराठा दिवस साजरा केला जातो. मराठा दिवस कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल राकेश मनोचा उपस्थित होते. मेजर जनरल राकेश मनोचा यांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम कोल्हापूरच्या कलाकारांनी सादर केला. तरुण आणि तरुणीनी सादर केलेली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके देखील उपस्थितांचे आकर्षण ठरली. मराठा दिवस कार्यक्रमाला लष्कराचे अधिकारी, जवान, त्यांचे कुटुंबीय, सेवानिवृत्त अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *