Tuesday , March 3 2026
Breaking News

तिसरा पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेचा शुभारंभ

Spread the love

 

पहिल्या दिवशी अनेक विक्रम मोडले

बेळगाव : आबा हिंदी स्पोर्ट्स क्लब व क्रीडा भारती बेळगाव यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण
स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटात झाले. सकाळी दहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर श्री. आनंद चव्हाण, नगरसेवक श्री. नितीन जाधव, हिंद स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष श्री. अरविंद संगोळी, चार्टर्ड अकाउंटंट राजेंद्र मुंदडा, अध्यक्ष शितल हुलभते, बीएससी टेक्सटाईल मॉलचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड मिस्टर अमजद व श्री. इराणा व जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने तसेच भारत मातेची व जलतरण तलावाची पूजा करून करण्यात आली. यावेळी उपस्थित जलतरणपटू, पालक, प्रशिक्षक व क्रीडा प्रेमींना उद्देशून पाहुण्याने जलतरणपटूना प्रोत्साहन देत असल्याबद्दल त्यांनी पालकांचे, क्रीडा प्रशिक्षकांचे कौतुक केले तसेच जलतरणपटूंना त्यांच्या कामगिरीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या दिव्यांगाच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेऊन बेळगावच्या मयंक हलदरने दोन सुवर्णपदके मिळवली याबद्दल त्याचा उपमहापौर आनंद चव्हाण तसेच नगरसेवक नितीन जाधव व पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत एकूण 250 मुला- मुलीने कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र यामधून सहभाग दर्शवला आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *