Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी विश्वकर्मा अभिवृद्धी संघातर्फे विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील लेटेक्स कॉलनी आवटे प्लॉट मधील श्री विश्वकर्मा अभिवृद्धी संघातर्फे श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील सुतार, लोहार बहुउद्देशीय संघाचे नामदेव सुतार तर प्रमुख पाहुणे म्हणून गोवा येथील उद्योजक शिवाजी सुतार होते.

प्रारंभी सेक्रेटरी अरुण सुतार व खजिनदार संजय सुतार यांच्या हस्ते विश्वकर्मा प्रतिमेचे तर श्री कालिका माता प्रतिमेच पूजन राणी सुतार व सरिता सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. अरुण सुतार यांनी, विश्वकर्मा अभिवृद्धी संघाच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर समाजातील गुणी विद्यार्थी व मान्यवरांचा संघातर्फे सत्कार झाला. माजी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, माजी सभापती राजू गुंदेशा यांनी मनोगत व्यक्त करून समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्षा नीता बागडे, माजी नगरसेवक दत्ता जोत्रे माजी, संघाचे अध्यक्ष प्रकाश सुतार, उपाध्यक्ष रामचंद्र सुतार, खजिनदार संजय सुतार यांच्यासह संघाचे संचालक व समाज बांधव, महिला उपस्थित होत्या. श्री विश्वकर्मा विठ्ठल भजनी मंडळातर्फे महादेव सुतार व महीलांचा कार्यक्रम झाला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *