Tuesday , March 3 2026
Breaking News

भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या युवक व युवतींचा श्री हणमंतगौंड ध्रुवनिधी ट्रस्ट, येळ्ळूर यांच्यावतीने सत्कार

Spread the love

 

येळ्ळूर : युवक- युवतींनी आपले भवितव्य घडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, आई -वडिलांची आज्ञा पाळावी, आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे प्रतिपाद‌न प्रा.इंद्रजित मोरे यांनी श्री ह‌णमंतगौड ध्रुवनिधी ट्रस्ट येळ्ळूरतर्फे 2025-26 साली सैन्यदलात भरती झालेल्या येळ्ळूरमधील युवक, युवती व जवानांच्या आई -वडिलांच्या सत्कार समारंभात प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष सी. बी. पाटील होते.

येळ्ळूर गावातील युवती सैन्यदलात भरती होण्याचे श्रेय अर्थात सैन्यदलात महिलांना सहभागी होण्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री माननीय शरदराव पवार यांना जाते. त्यांनी महिलांसाठी पुरक नियम बदल केले आहेत. पहलगाम हल्ल्यात भारतीय सैन्यात दोन महिलांनी शौर्य दाखविले आहे. असे विचार प्रमुख वक्त्या या नात्याने बोलताना ॲड. सरिता स. पाटील यांनी व्यक्त केले.

श्री चांगळेश्वरी मंदिराच्या प्रांगणात नुकताच हा कार्यक्रम पार पडला. यापूर्वी श्री हणमंत गौड ट्रस्टने अनेक कार्ये केली आहेत त्याला अनुसरण प्रतिवर्षी अशा कार्यक्रमांची भर घालूया, येळ्ळूर गावाच्या सर्वागिण विकासासाठी जे जे उत्तम उदात होईल त्याला मदत केली पाहिजे. सकारात्मक विचार हे सर्वांना तारणारे आहेत. सर्वांना सामंजस्याने बरोबर घेवून ट्रस्टचे कार्य प्रगतीपथावर नेवूया, असे विचार कार्यक्र‌माच्या अध्यक्षस्थानावरून अध्यक्ष सी. बी. पाटील यानी मांडले.

प्रारंभी चांगळेश्वरी देवीचे पुजन ऍडव्होकेट सौ. सरिता पाटील, प्राध्यापक इंद्रजित मोरे व सी. बी. पाटील यांनी केले, मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. निवृत्त शिक्षक आनंद पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

ईशस्तवन व स्वागतगीत मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूरच्या विद्यार्थिनींनी सादर केले. या प्रसंगी 2025-26 साली सैन्यदलात भरती झालेल्या कुमार साहिल शंकर पाटील, कुमार ज्योतिबा आनंद कंगराळकर, कुमारी अक्षता अनिल पाटील, कुमारी तन्वी भाऊराव पाटील तसेच 2025-26 साल अगोदर भरती होऊन रुजू झालेल्या जवानांच्या आई वडिलांचा सत्कार यामध्ये विश्वनाथ केशव पाटील, प्रथमेश जितेंद्र पाटील, प्रेम प्रवीण पाटील, चंदन कुमार खेमनाकर, भगवंत रवळनाथ कुगजी, जोतिबा मल्लाप्पा गोरल, धीरज बजरंग घाडी, बाळू महादेव हट्टीकर, अमोल मनोहर पाटील, यश सुरेश खनगावकर, श्रद्धा सुभाष धुळजी यांच्या मातापित्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास ग्राम पंचायत माजी अध्यक्ष सतीश पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, व्ही डी पाटील सर, पांडुरंग य पाटील, आनंद बा पाटील, हणमंत आ पाटील, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, माजी सदस्य शांताराम कुगजी, येळ्ळूर विभाग समिती अध्यक्ष विलास घाडी, माजी ग्राम पंचायत सदस्य गोविंद पाटील, उद्योगपती, एन डी पाटील, माजी ग्राम पंचायत अध्यक्षा सुलभा पाटील, नवहिंद महिला पतसंस्था अध्यक्षा सौ. माधुरी द. पाटील, सदस्या नम्रता पाटील, पद्मा पाटील, वंदना पाटील, प्रियांका पाटील, वीणा पाटील, वाय. एन. पाटील, बाळकृष्ण पाटील, ॲड. हणमंत पाटील, पै गणपत हट्टीकर, मनोहर सि पाटील, भुजंग बा पाटील, निखिल पाटील, सिद्धार्थ पाटील, संदीप बा पाटील, विष्णू पाटील, बापूसाहेब पाटील, सुरेश पाटील, बाळकृष्ण अ पाटील मधु पाटील, सत्यजित पाटील, डी एन पाटील, राजू पाटील, सुनील ल पाटील, रमेश पाटील, बबन कानशिडे, उदय जाधव, पी एन गोरल, प्रकाश रामचंद्र पाटील, अशोक रामचंद्र पाटील, अनंत गा पाटील, सुनील पाटील अशी विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताजी पतसंस्थेचे चेअरमन डी जी पाटील यांनी केले. शेवटी अनिल पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *