Saturday , December 13 2025
Breaking News

भास्कर राव यांचा आम आदमी पक्षात प्रवेश!

Spread the love

बेंगळुरू : दिल्ली, पंजाब विधानसभेची निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीनं आपला मोर्चा आता गुजरात, कर्नाटकाकडं वळवलाय. गुजरात आणि कर्नाटक विधानसभेची निवडणूक 2023 मध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आप पक्षात प्रवेश केलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भास्कर राव यांना पक्षाचं सदस्यत्व मिळवून दिलंय. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, दिल्लीतील आप सरकारची प्रतिमा देशभरात विखुरत आहे. त्याचाच परिणाम पंजाबमध्ये दिसून आला. पंजाबच्या निकालामध्ये जनतेनं अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला आपला कौल दिला होता, आता त्याची लाट दक्षिणेतही पाहायला मिळत आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी नोकरी सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. भास्कर राव काम पाहण्यासाठी नेहमी दिल्लीत येत असतं. भास्कर राव हे बंगळुरूचे पोलीस आयुक्त होते. जे काम नेत्यांना करायचं होतं, ते समाजहिताचं काम राव यांनी स्वत: केलं, असं सिसोदिया यांनी सांगितलंय.

माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव म्हणाले, मी 25 वेळी पोलिस नोकरी केलीय. शिवाय, सैन्यातही कामगिरी बजावलीय. मी दिल्लीत असताना एक दिवस टॅक्सी चालक मला शाळा दाखवायला घेऊन गेला आणि त्यानं दवाखानाही दाखवला. या काळात हे घडू शकतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा संघर्ष आणि जीवन पाहून मी प्रभावित झालो. कर्नाटकातील सामान्य माणसालाही बदल हवाय. पारंपरिक पक्ष आपण खूप बघितले आहेत. पक्ष गेले, पण व्यवस्था बदलली नाहीय. म्हणून, मी आम आदमी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगुंदी येथे शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अतिप्रसंग; गावकऱ्यांनी शिक्षकाला चोपले

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *