
बेळगाव : सर्व हवामानाची विविधता ही फक्त आपल्या देशातच दिसते त्यामुळे हवामान व पाऊस याबाबतीत भारत सुदैवी देश आहे असे प्रतिपादन बी. के. मॉडेल हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. एल. मजूकर यांनी केले.
बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘भारताचे हवामान’
या विषयावर बोलत होते. डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ, टिळकवाडी येथे कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील व सायमन मेडोसा (गुजरात) उपस्थित होते.
यावेळी अश्विनी पाटील, विजयमाला पाटील, डॉ. श्रेयस चौगुले, रविंद्रनाथ जुवली, औदुंबर शेट्ये, विजय वाईगडे, अशोक लोकूर यांनी हिंदी, मराठी, कन्नड गीते सादर केली तर विजय बांदिवडेकर यांनी सादर केलेला अभंग उपस्थितांची मने जिंकून गेला.
प्रारंभी कार्यकारिणी सदस्य सदाशिव कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरेन्द्र देसाई यांनी प्रास्ताविक केले तर शिवराज पाटील यानी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta