Monday , September 21 2026
Breaking News

चिक्कोडी – बेळगाव मार्गावर बस-दुचाकीचा अपघात महिलेचा जागीच मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : मागून येणाऱ्या बसने दुचाकीला धडक दिल्याने एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चिक्कोडी- बेळगाव मार्गावरील संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अमीनभावी गावाजवळ घडली.

कागवाड तालुक्यातील शिरगुप्पा गावातील सुवर्णा मोने (३७) असे मृत महिलेचे नाव असून त्या अरिहंत संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या आणि दुचाकीवरून बेळगावकडे येत असताना हा अपघात झाला.

याप्रकरणी संकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ४८/२०२६ मध्ये कलम २८१, १०६(१) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *