Tuesday , March 3 2026
Breaking News

राजहंसगड ते येळ्ळूर मराठी सन्मान यात्रेचा पहिला टप्पा

Spread the love

 

बेळगाव : मराठी सन्मान यात्रेच्या संदर्भात पुढील नियोजनासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक आज मराठा मंदिर येथे पार पडली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके हे होते.

बैठकीच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश सांगितला व २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन २५० सीमावासीय कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले.

येत्या शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून दुपारी ३.३० वाजता राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीला अभिवादन करून या मराठी सन्मान यात्रेला सुरुवात होणार असून तेथून बाईक रॅलीने सुळगा (ये.) व तेथून येळ्ळूर येथे आगमन होऊन गावात बाईक रॅली होणार आहे. त्या नंतर येळ्ळूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठी सन्मान यात्रेची सभा होणार आहे. तर पुढील मराठी सन्मान यात्रा टप्प्या टप्प्याने होईल तसे माध्यमाद्वारे कळविण्यात येईल, असे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले.

सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी या बैठकीतील खालील ठराव वाचून दाखविले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने त्यांना श्रद्धांजली वाहून श्रध्दांजलीचा पहिला ठराव मांडण्यात आला,

तर दुसऱ्या ठरावात किल्ले रायगड येथे सन्मान यात्रेचे दर्जेदार वृत्तांकन करणाऱ्या माणगाव रायगड येथील पत्रकार नरेश विठ्ठल पाटील व सीमाभागातील मराठी पत्रकारांच्या अभिनंदनाचा व सहभागी कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात येत्या १६ फेब्रुवारीपासून त्रीसदस्यीय खंडपीठ पुन्हा उपलब्ध होणार असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने वारंवार महाराष्ट्र् सरकारकडे पाठपुरावा केला आहे, तरी महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी न्यायालयीन कामकाजाकडे गांभिर्याने लक्ष देऊन चालना द्यावी, असा ठराव करण्यात आला.

तसेच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी प्रगतशील लेखक संघ साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी सीमाभागात एक लाख सह्यांची मोहिम राबवावी असे आवाहन केले. या आवाहनाला पाठिंबा देऊन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आशा उपक्रमात सहभागी होण्याचा ठराव संमत करण्यात आला.

या बैठकीला शिवाजी हावळानाचे, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, इंद्रजीत धामणेकर, शशिकांत सडेकर, सुरज जाधव, श्रीकांत नांदुरकर, अभिषेक कारेकर, निलेश काकतकर, रोहित जाधव, ओमकार जाधव, साईराज कुगजी, सविता राऊत, अभिजीत मजुकर, प्रतीक गुरव, रणजित हवळाणाचे, आदी उपस्थित होते, उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *