Monday , September 21 2026
Breaking News

बोरगाव येथील पी. एम. श्री. मराठी शाळेत ‘अभ्यास जत्रा ‘उपक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील पी.एम. श्री. सरकारी मराठी प्राथमिक शाळेत बोरगाव सी. आर. सी. पातळीवरील ‘अभ्यास जत्रा’ उपक्रम पार पडला.बोरगाव सी.आर.सी. प्रमुख राजू कोकणे, मुख्याध्यापक आर. एम. पकाले शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष. शिवाजी भोरे, उपाध्यक्षा स्वाती शिंगेव मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलाने कार्यक्रमाचे उद‌घाटन झाले.
राजू कोकणे यांनी, म्हणाले, अभ्यास जत्रा ही स्पर्धा नसून अभ्यासात मागे असलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक संधी आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. मुख्याध्‌यापक आर. एम. पकाले यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना आनंददायक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यास जत्रा’ उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगितले. ऊर्दू शाळेचे मुख्याध्यापक आय. एस मुल्ला यांनी विद्यार्थ्यांचे पायाभूत शिक्षण पक्के होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणजे अभ्यास जत्रा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थी सहसंबंध,कथाकथन, आनंददायक गणित, आरोग्य आणि पौष्टिकांश, वेषभूषा अभिनय, स्पष्टवाचन झाले. विद्यार्थी आणि पालकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवून कौशल्याचे प्रदर्शन केले. त्यामध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थी आणि पालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास बोरगाव सी.आर.सी. व्याप्तीतील विविध शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षिका, परीक्षक उपस्थित होते. एम. व्ही मिरगे सूत्रसंचालन केले. एस. एम. जाधव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *