
बेळगाव : दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये चित्रकला, हस्तकला व संगणक प्रकल्प प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उद्घाटक शौरीका गरगट्टी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संगणक विभाग प्रमुख श्रुती बेळगावकर यांनी केला. तर पाहुण्यांचे स्वागत शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपण आपला निर्णय पक्का ठरवावा. कोणी विचारलं म्हणून आपला निर्णय बदलू नये, स्वतःला वेळ द्यावा, स्वतःवर प्रेम करावं, स्वतःचं कौतुक करावं, आपल्या छंदाला वेळ द्या असे मनोगत प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. कला ही मुलांच्या नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारी असते. हस्तकला, कल्पकता आणि कौशल्य यांचा मिलाफ आहे. अशाच नाविन्यातून शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, विविध चित्रे आणि संगणकावरील प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याचवेळी प्रदर्शन व विक्रीही चालू आहे. कलाशिक्षिका लता नगरे, अमृत गवस, संगणक शिक्षिका पद्मजा कुऱ्याळकर, अंजली बाबू गावडे, श्रुती बेळगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, सदस्य किरण पाटील, शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका नम्रता पाटील तर आभार विद्यार्थिनी कलाश्री बागेवाडी हिने केले. दिनांक 10फेब्रुवारी व 11 फेब्रुवारी रोजी हे प्रदर्शन खुले असेल.
Belgaum Varta Belgaum Varta