Sunday , July 26 2026
Breaking News

चलवेनहट्टी येथील महिलांच्या वतीने बेक्कीनकेरे महालक्ष्मी मातेच्या चरणी ११ तोळ्याचा चांदीचा दागिना अर्पण

Spread the love

 

बेळगाव : बेक्कीनकेरे गावची महालक्ष्मी यात्रा ६६ वर्षांनी आयोजित करण्यात आली आहे. त्या निमित्ताने संपुर्ण पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण आहे. विषेश म्हणजे चलवेनहट्टी व बेक्कीनकेरे गावचे नातेसंबंध मोठ्या प्रमाणात आहे. या दोन्ही गावात मुलीचे नाते संबंध पुर्वी पासुन आजतागायत कायम आहे. त्यामुळे बेक्कीनकेरे या गावातून चलवेनहट्टी येथे लग्न करून आलेल्या महिलांनी या महालक्ष्मी यात्रेचे औचित्य साधून माहेरच्या देवीला आकरा तोळ्याचा चांदीचा राणीहार भेट दिला आणी देवीची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहावो अशी प्रार्थना देखील केली.
यावेळी धनगरी ढोलांच्या गजरात व‌ भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या उत्साहात दागिन्याची मिरवणूक काढण्यात आली, ही मिरवणूक नागनाथ मंदिर येथून सुरवात करुण महालक्ष्मी मंदिरात दाखल झाली. या मिरवणुकीत महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. या वेळी महालक्ष्मी यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा राणीहार दागिन्याचा स्विकार करुन महालक्ष्मी मूर्तीला परिधान करण्यात आला. यावेळी दागिना भेट देणाऱ्या महिलांचे यात्रा उत्सव समितीच्या वतीने कौतुक करण्यात आले‌. यावेळी उपस्थित प्रत्येक महिलांना नारळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करत आभार मानले यावेळी रेणुका अशोक पाटील, लीला हुंदरे, रेणुका पाटील, राधिका पाटील, नंदा पाटील, लक्ष्मी सनदी, लक्ष्मी हुंदरे, लक्ष्मी पाटील, यल्लु पाटील, सुनिता पाटील, लक्ष्मी यल्लाप्पा पाटील, लक्ष्मी सिद्राय पाटील, मुक्ता हुंदरे, इरव्वा पाटील, कविता पाटील, सुनंदा हुंदरे, इंदू हुंदरे, मल्लव्वा हुंदरे, प्रियंका हुंदरे, मलप्रभा पाटील, शोभा कंलखाबकर, आनंदा पाटील, लक्ष्मी कृष्णा पाटील, पुजा परशराम पाटील, आदी महीला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *