
बेळगाव : यरमाळ रोड वडगाव येथे एक वृक्ष पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत आहे. यरमाळ रोड येथून मंगाई नगर परिसरात तसेच यरमाळ रस्त्यावरील शेतवडील ये-जा करताना नागरिकांची बरीच वर्दळ असते. ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी मुले या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. रस्त्याच्या कडेला पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेतील हे झाड तोडण्याची अनेकदा संबंधित खात्याला विनंती वजा तक्रार करून देखील नागरिकांनी केली. पण प्रशासनाने नागरिकांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. या रस्त्यावरून नागरिक ये-जा करीत असतात तसेच या झाडाच्या शेजारी विद्युत वाहिन्या गेल्या आहेत हे झाड वाऱ्याने उन्मळून रस्त्यावर पडल्यास एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे झाड तात्काळ तोडून प्रशासनाने संभाव्य धोका टाळावा, अशी विनंती वडगाव यरमाळ रोड परिसरातील नागरिक करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta