Tuesday , March 3 2026
Breaking News

क्रीडाभारती अखिल भारतीय नियामक मंडळ बैठकीला प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : मंडोळी रोड येथील साईराज लॉनच्या सभागृहात अखिल भारतीय क्रीडाभारती नियामक मंडळ बैठकीला शुक्रवार ता. 13 रोजी प्रारंभ झाला.

या बैठकीला प्रमुख पाहुणे क्रीडाभारती अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, क्रीडा भारती संघटनमंत्री प्रसाद महानकर, मिलिंद डांगे, रामानंद चौधरी भारती गणपुले, रिना सिंग, कर्नाटक राज्य क्रीडाभारती अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, उपाध्यक्ष अँड सुधीर धामणकर, विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, विश्वास पवार, परशुराम मंगनाईक या मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व हनुमान फोटो पुजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक चंद्रशेखर जहागिरदार यांनी केले त्यानंतर राज्याच्या क्रीडा भरतीच्या कार्याचा गौरव केला यानंतर तीन दिवस चालणाऱ्या या अखिल भारतीय बैठकीला प्रारंभ झाला या देशभरातून उमेश कुमार, बसवराज, माधव बेहरा, मनोज मोहंती, सुमित उपाध्ये, डॉ. संदीप त्यागी, डॉ. लालन कुमार, मधुमेह नाथ, श्रीकांत धर्माधिकारी, रमेश प्रजापती, आनंद डी रजत दीक्षित, राकेश गोस्वामी, चैतन्य कुमार कश्यप हे पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. याप्रसंगी तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात 2036 सालाच्या भारतात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून खेळाडूंना व युवकांना मार्गदर्शन तसेच क्रीडाक्षेत्राला नियोजनबद्ध योजना आखण्यासाठी या बैठकीत मंथन व चिंतन करण्यात येणार आहे यासाठी कर्नाटक राज्य क्रीडा भारती राज्याध्यक्ष ऑलिंपियन मुकुंद किल्लेकर, सचिव ज्येष्ठ अथलेटिक प्रशिक्षक अशोक शिंत्रे, विश्वास पवार, परशुराम मंगनाईक, उमेश कुलकर्णी, नामदेव मिरजकर, चंद्रकांत पाटील, रोहिणी पाटील, उमेश बेळगुंदकर, आनंद पाटील, मयुरी पिंगट, वाय सी गोरल, मोहन पत्तार, एन एन काटकर, टिना वानखेडे, संभाजी देसाई उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *