Sunday , July 26 2026
Breaking News

तिर्थकुंडेत मंगळवारी कुस्ती मैदान

Spread the love

 

बेळगाव : तिर्थकुंडेतील (ता. खानापूर) रामलिंगेश्वर देवस्थान कमिटीतर्फे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवार दि. १७ दुपारी तीन वाजता निकाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती भारत केसरी रोहित लाडपूर वि. शिवगर्जना केसरी शुभम सिदनाळे यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती हरिषकुमार हरियाणा वि. समीय देसाई (पुणे), तिसरी प्रेम कंग्राळी वि. विशाल शेळके (पुणे), चौथी प्रथमेश हट्टीकर वि. तेजस गोपनी, पाचवी निखिल कंग्राळी वि. कार्तिक इंगळे यांच्यात होणार आहे. याशिवाय महेश तिर्थकुंडे वि. रियाज शेख सांगली यांच्यात मेंढा बक्षीस असलेली कुस्ती होणार आहे. या मैदानात ४० हून अधिक कुस्त्या रंगणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *