
समाज सारथी सेवा संघाच्या बैठकीत चिंतन
येळ्ळूर : दिवसेंदिवस युवापिढी व्यसनाधिन होत असुन अनेकांचे जीवन बरबाद होते आहे. त्याचा त्रास जन्मदाता आईवडिलांना होतो याच भान ठेवत युवकानी आत्मचिंतन करावे, असा सल्ला संघटनेचे हिशोब तपासणीस गोविंद काळसेकर यानी दिला. ते समाज सारथी सेवा संघाच्या बैठकीत बोलत होते अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल होते.
आज गावात दारू, गांज्या, सिगोरेट, स्टार या सारखे आमली पदार्थ सहजगत्या प्राप्त होत असल्याने युवकाबरोबर अल्पवयिन मुलेही व्यसनात गुरफटल्याचे चित्र आहे. यामूळे कुटुबाबरोबर समाजालाही याचा त्रास होत असुन पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे त्याना वेळीच सावाले नाही तर येणारा काळ आपल्या पिढीला क्षमा करणार नाही असे सांगत यावर ठोस उपाय आणि प्रबोधन अत्यावशक असल्याचेही त्यांनी सांगितले त्यासाठी या संघटनेने हे काम हाती घ्यावे आणि युवापिढील योग्य मार्गावर आणावे असाही विचार त्यानी यावेळी मांडला.
गावामध्ये डॉल्बी मुक्तीसाठी प्रयत्न आवश्यक
आता लग्नाचा सिजन सुरु झाला आहे. लग्न कार्य हा एक पवित्र मंगल सोहळा आहे. पण लगनाचे आजचे स्वरूप बघता आपण आपले संस्कार विसरत चाललो असल्याचे चित्र आहे. लग्नाचा काढलेला शुभ मुहुर्त आणि लग्न लावण्याचा काळ वेळ बघता केवळ आपण डॉल्बी आणि बँडच्या तालावर नाच यासाठीच लग्न समारंभ करतो असे चित्र आहे. आनंद व्यक्त करताना वेळेचे भान ठेवावे. लग्नासाठी आलेली पै.पाहुणे, आणि ताटकळत थांबलेली मित्र मंडळी बघता त्यांच्या आनंदावर विरजन पडल्याचे चित्र पहायला मिळते. आता मुलांच्या परीक्षांचा काळ सुरू असुन मध्यरात्री पर्यंत डॉल्बीच्या कर्कश आवाजात वरात आणि वरातीत लावलेले जाणारे मोठया आवाजाचे फटाके याला आवर घालत वरात लवकर संपवावी आणि लग्नसमारंभ लग्ना सारखाच पार पाडावा. ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीच्या यात्रा काळात गतवर्षी प्रत्येक गल्लीमध्ये डॉल्बी लावण्यात आला होता. डॉल्बीचा कर्ण कर्कश आवाज आजारी व वयस्कर माणसांना त्रासदायक ठरतो. याची जाणीव आजच्या युवा पिढीने ठेवणे गरजेचे आहे. ठराविक डेसिबल पर्यंतच आवाज आपला कान सहन करू शकतो. याचं गांभीर्याने युवा पिढीने विचार करावा, लग्न समारंभ वेळेत पार पाडणे व डॉल्बीमुक्त गावासाठी प्रयत्न करण्याचा हा पायंडा आपल्या गावातुन, आपल्या समाजातून सुरू करूया असा विचार अनिल हुंदरे यानी यावेळी मांडले. यावर हणमंत पाटील, मनोहर गोरल, गंगाधर पाटील यानी याबाबा मौलीक सूचना करून गावाला साथीला घेत समाजाला एक आदर्श देऊया असे सांगितले.
यावेळी परशराम कणबरकर, शिवाजी सायनेकर, प्रकाश अष्टेकर बळीराम देसुरकर, रमेश धामणेकर, प्रकाश पाटील, डॉ. तानाजी पावले, प्रकाश पाटील, सुरज गोरल, परशराम बिजगरकर, संजय गोरल, संजय मजुकर, यल्लुप्पा पाटील, परशराम धामणेकर, राजू पावले, सतीश पाटील, कृष्णा टक्केकर, परशराम नि. धामणेकर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक बी एन मजुकर यानी केले तर आभार डॉ. तानाजी पावले यानी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta