Sunday , July 26 2026
Breaking News

‘मराठी सन्मान यात्रे’ला येळ्ळूर म. ए. समितीचा पाठिंबा

Spread the love

 

येळ्ळूर : 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी सन्मान यात्रेत बहुसंख्येने हजर राहून यशस्वी करण्याचा निर्धार येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. गोविंद बापूसाहेब पाटील हे होते.
प्रारंभी श्री. प्रकाश अष्टेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना युवकांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकसंघ राहून कार्य करावे, असे प्रतिपादन केले.

रमेश पाटील यांनी, श्री दत्त भजनी मंडळ आणि पाटील गल्ली भजनी मंडळ यांनी शिवरायांची राजधानी किल्ले ‘रायगड’ येथे जाऊन सीमाप्रश्नाचा जागर केल्याचे सांगितले आणि रायगड किल्ल्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भजनी मंडळ किल्ल्यावर आल्याची विशेष नोंद करण्यात आली आणि तो मान येळ्ळूर गावाला मिळाला असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी कथन केला. यावेळी बैठकीला मार्गदर्शन करताना वामनराव पाटील यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षांपासूनचा येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याचा आढावा घेवून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागातून महाराष्ट्रात जाण्याचं स्वप्न साकार होणार आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने संघटना बळकटीचा हा उपक्रम यशस्वी करुया असे सांगितले.
ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष श्री. दुद्दापा बागेवाडी यांनी, येळ्ळूरची जनता निष्ठेने म. ए. समितीच्या ध्येय धोरणानुसार कार्य करत राहील, याची खात्री दिली. येळ्ळूर पुर्व भागात संघटना बळकटी आणि दैनंदिन समस्या यावर अनेक युवा कार्यकर्त्यांनी या बैठकीत उहापोह करण्यात आला येत्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून संघटित पणे सर्व समस्या निवारणासाठी प्रयत्न शील राहूया असे सांगून सर्व युवा कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले
या बैठकीत दत्ता उघाडे, बी. एन. मजुकर, राजू पावले, सुरज गोरल, गणेश अष्टेकर आदिनी आपले विचार व्यक्त केले.
या बैठकीला माजी ता.पंचायत सदस्य चांगदेव परीट, सतीश परशराम धामणेकर, विलास पाटील, राकेश परीट, चांगदेव शहापूरकर, राजाराम हुंदरे, मारुती शहापूरकर, अजित शहापूरकर, गजानन कुंडेकर, विनोद कुंडेकर, कृष्णा शहापूरकर, सचिन कुंडेकर, बाळू कुंडेकर, प्रवीण कंग्राळकर, उत्तम खनगावकर, विठ्ठल लोहार, राहूल कुगजी, लक्ष्मण कुंडेकर, आकाश नायकोजी, विजय पाटील, संतोष नायकोजी, तुषार सांबरेकर, प्रकाश पाटील, शिवाजी कदम, सतीश देसुरकर, दयानंद उघाडे, नेताजी गोरल, यल्लुपा पाटील, प्रकाश मालुचे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी म्हात्रू लोहार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *