Sunday , September 20 2026
Breaking News

‘जीवनानंद’ पुस्तक श्रमातून समृद्धीकडे नेणारी प्रेरणादायी वाट

Spread the love

 

डॉ. अच्युत माने : निपाणीत पुस्तक प्रकाशन सोहळा

निपाणी (वार्ता) : प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने उभे राहत स्वतःला सिद्ध करणाऱ्या प्रा. आनंद संकपाळ यांनी ‘जीवनानंद’ या पुस्तकातून श्रमातून समृद्धीकडे जाणारी प्रेरणादायी वाट समाजासमोर ठेवली आहे, असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अच्युत माने व्यक्त यांनी केले. येथील बी. आर. पाटील स्मृती सभागृहात प्रा. आनंद संकपाळ लिखित ‘जीवनानंद’ या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. पुस्तकाचे प्रकाशन मातोश्री रत्ना मारुती संकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले, तर पुस्तक प्रकाशित झाल्याची घोषणा डॉ. एम. जे. कशाळीकर यांनी केली.
व्यासपीठावर डॉ. सुहास शहा, अजित वारकरी, संजय कदम, चंद्रकला संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याला प्रारंभ झाला. लेखक प्रा. आनंद संकपाळ यांनी मनोगतात आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास मांडत उपस्थित मान्यवर व साहित्यप्रेमी यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.प्रा. नानासाहेब जामदार यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. कशाळीकर म्हणाले, आनंद यांचे जीवन अथक, प्रामाणिक मेहनतीचे प्रतीक असून त्यामुळेच ते प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले. डॉ. सुहास शहा यांनी आनंद यांचे जीवन हे समाजासाठी दीपस्तंभासारखे असल्याच गौरवोद्गार काढले. निवृत्ती घाटगे, प्राचार्य एम. आर. ढेकळे यांनी त्यांच्या जीवनातील भावपूर्ण आठवणी सांगितल्या. प्रा. जे. डी. कांबळे यांनी आनंद यांचे जीवनच एक पुस्तक बनल्याचे सांगितले.
चिकोडी एलआयसी शाखा अधिकारी संजय कदम व माजी डिव्हिजनल मॅनेजर अजीत वारकरी यांनी एलआयसी परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विशेषतः मातृत्वाचा गौरव म्हणून आई रत्ना मारुती संकपाळ यांचा सन्मान करण्यात आला. शशीभाई शहा, अनिल श्रीखंडे, नानासाहेब जामदार, डॉ. सुहास शहा, निवृत्ती घाटगे, एम. आर. ढेकळे, निरंजन कमते, आशा तिळवे, गुलाबराव पाटील, बाबासाहेब मगदूम, भीमराव संकपाळ आदींचा सन्मान करण्यात आला.
डॉ. रमेश साळुंखे, कृष्णा खोत, डॉ. सतीश जाधव, डॉ. श्रीपती रायमाने, कबीर वराळे, उमेश शिरगुप्पे, प्रमोद कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास चंद्रकांत कोठीवाले, समीर बागेवाडी, प्रा. व्ही. ए. उपाध्ये,‌ डाॅ.एन.‌ डी. जत्राटकर, कल्पना ढेकणे, डॉ. सुनीता देवर्षी, सतीश दावलभक्त, गणी पटेल,अस्लम शिकलगार, जयराम मिरजकर, ॲड. राम चव्हाण, उदय शिंदे, विठ्ठल वाघमोडे, व्ही. ए. नगरे, एस.एल. पाटील, एस. आर. पाटील, दशरथ कुंभार, जे.‌ डी.‌ शिंदे,‌ बी. आर. ढेकळे, विश्वनाथ बाडकर, दिग्विजय निंबाळकर, गुलाबराव पाटील,‌ संभाजी गायकवाड, अण्णासो खोत, लक्ष्मण संकपाळ, संदीप संकपाळ व, सुयोग जोशी, सदाशिव लकडे, विश्वनाथ गुरव, सुधाकर माने, सुरेश कांबळे, निखिल निचिते, अभिषेक संकपाळ, राजू कल्लोळे, सुनील सटाले, प्रा.प्रवीणसिंह शिलेदार, प्रा.आशालता खोत, निपाणी पतंजली योग शिक्षक-साधक, रोटरी, आविष्कार सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. अमृता आनंद संकपाळ यांनी केले. डॉ.चंद्रकांत डावरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *