Friday , March 6 2026
Breaking News

निवृत्त कर्नल ए. एम. ज्ञानकन यांचे निधन

Spread the love

 

बेळगावातील सैनिक, मार्गदर्शक व चर्च नेते हरपले

बेळगाव : भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी कर्नल ए. एम. ज्ञानकन (वय ८७) यांचे १६ फेब्रुवारी २०२६ रोजी निधन झाले. ते एक कर्तृत्ववान सैनिक, आदरणीय समाजनेते आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
१९३८ साली जन्मलेल्या कर्नल ज्ञानकन यांनी आयुष्यभर देशसेवा आणि समाजसेवेला वाहून घेतले. 14 Grenadiers या बटालियनचे वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धांत धैर्याने नेतृत्व केले. नेफा (NEFA) तसेच जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील भागांत त्यांनी सेवा बजावत सहकाऱ्यांचा व अन्य अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला.
अनेक तरुण अधिकाऱ्यांसाठी ते केवळ कमांडिंग ऑफिसर नव्हते, तर मार्गदर्शक व प्रेरणास्थान होते.
सैन्यातून निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक व आध्यात्मिक कार्यात स्वतःला झोकून दिले. मागील २५ वर्षांपासून त्यांनी St Mary’s Church, BC 81चे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात चर्चची आध्यात्मिक व सामाजिक उभारणी झाली. १६५ वर्षांनंतर करण्यात आलेल्या चर्चच्या नूतनीकरणाचे नेतृत्वही त्यांनीच केले.
तसेच Bombay Diocesan Trust Association Pvt Ltd या संस्थेचे उत्तर कर्नाटक व कोल्हापूर विभागाचे निवासी संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार अवयव दान सुद्धा करण्यात आले. अंत्यविधी मंगळावर दि 17 रोजी दुपारी 3.30 वाजता सेंट मेरीज चर्च, कॅम्प येथे प्रार्थनेनंतर होईल.

About Belgaum Varta

Check Also

राज्याचा अर्थसंकल्प जनतेची दिशाभूल करणारा : भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *