Tuesday , March 3 2026
Breaking News

‘शांताई विद्या आधार’ संस्थेची आर्थिक मदत

Spread the love

 

बेळगाव : गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पैशांची अडचण येऊ नये, या उद्देशाने बेळगावमधील ‘शांताई विद्या आधार’ संस्थेने घरातील जुनी वर्तमानपत्रे विकून जमा झालेल्या निधीतून आज शहरातील एका माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात दिला.

बेळगावमधील राणी चन्नम्मा नगर येथील भारतीय विद्याभवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला आज संस्थेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. टिळकवाडी येथील शांताई विद्या आधार कार्यालयात आयोजित एका साध्या कार्यक्रमात विद्यार्थ्याच्या वडिलांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. माजी महापौर विजय मोरे आणि विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था जुनी वर्तमानपत्रे, पुस्तके आणि पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू गोळा करते आणि त्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी पात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वापरला जातो.याप्रसंगी विश्वास पाटील, विनायक बोंगाळे आणि अलन विजय मोरे उपस्थित होते. विनायक लोकूर, संतोष ममदापूर, सूरज गवळी यांच्यासह अनेक स्वयंसेवक या अनोख्या योजनेच्या यशासाठी परिश्रम घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *