Monday , September 21 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये शिवजयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करण्यात आले.

यावेळी संपूर्ण शालेय परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या शिवगर्जनेने दुमदुमून गेला होता. शिक्षिका अक्षता मोरे यांनी प्रार्थनागीत सादर केले. विद्यार्थ्यांनी मावळे आणि शिवरायांची हुबेहूब वेशभूषा करून शिवकालीन इतिहासाला उजाळा दिला. शिक्षिका संजना कट्टी यांनी शिवरायांचा इतिहास सांगितला. तसेच या सोहळ्यात शिवरायांच्या जन्माचा पाळणा गायला गेला, ज्याने वातावरण भक्तीमय झाले. त्यानंतर स्फूर्तिदायक पोवाडा, शिवरायांच्या पराक्रमावर आधारित नृत्य आणि समूह गायन सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी आपल्या भाषणात शिवरायांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका आरती चिंगळी यांनी केले. शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताने या सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *