Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : द.म.शि. मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील शिक्षिका कमल हलगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी उडकेकर, शिक्षण समन्वयक सविता पवार उपस्थित होते.

इयत्ता चौथीच्या वर्गाच्या वतीने चित्र प्रदर्शन व गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन यानिमित्ताने भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या वरील गाणी, पोवाडे व भाषणाच्या माध्यमातून शिवरायांच्या कार्याचा आढावा घेतला. अनन्या सूर्यवंशी, समर्थ पाटील, शक्ती व भक्ती ठुमरी, संकल्प हळदणकर यांनी यात सहभाग घेतला. संगीत विभागातर्फे समुहगीताचे सादरीकरण ही करण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रसाद सावंत यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार कु. आरोही पाटील हिने केले.7

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *