
बेळगाव : दिनांक 19/02/2026 रोजी द.म.शि. मंडळाचे नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी. जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण सर होते.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील झुलवा पाळणा या गीताने झाली.
प्रारंभी नेताजी हायस्कूल मधील सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण सर आणि केले तर शिवमुर्ती जवळ श्री. एस. एस. केंगेरी सर (कन्नड शिक्षक) यांनी श्रीफळ वाढविले. तदनंतर कुमारी श्रुती भाऊराव होनगेकर, कुमारी सेजल मधुकर थोरवत, कुमारी राणी रामा इंगळे आणि कुमारी करुणा रमेश गडकरी व प्रिया श्रीकांत पाटील या विद्यार्थिनींची भाषणे झाली.
तदनंतर कुमारी करूणा रमेश गडकरी ह्या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्तुतुगीत गायले.
समाज विज्ञान विषयतज्ञ शिक्षक श्री. एम.पी. कंग्राळकर सर यांनी आपल्या भाषणातून शिवजयंती उत्सवाची सुरुवात समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. 1895 मध्ये प्रथमता सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पुजले जातात त्यांचे शुद्ध धोरण, मुच्छदेगीरी, गनिमी कावा,शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात. म्हणूनच त्यांची ही जयंती भारतासह संपूर्ण जगभर आनंदाने आणि अभिमानाने साजरी केली जाते. अशा परखड शब्दात आपले अनमोल विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात श्री. टी. वाय. भोगण सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यानं समोर मांडले.
प्रस्तुत कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर. ए. कंग्राळकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ.सुजाता व्हंडेकर मॅडम यांनी केले
Belgaum Varta Belgaum Varta