Tuesday , March 3 2026
Breaking News

नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थांना निरोप

Spread the love

 

बेळगाव : जी. ई. सोसायटी संचलित नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यीनींच्या स्वागत व ईशस्तवनाने झाली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यात अनेक सुप्त गुणांची शिदोरी लपलेली असुन त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते नक्कीच उच्चपदावर पोहोचू शकतात, अविरत आणि प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास आपण खूप मोठाले यश प्राप्त करु शकतो. डॉ. अब्दुल कलाम, डॉ. आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थांनी प्रयत्न करावे असे वक्तव्य प्रमुख वक्ते म्हणून बिडी येथील सरकारी उच्चपदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. जंगूभाई यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. महेश बिडीकर यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिला विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेड लागले की यश त्यांच्या पाठीशी उभे राहिते. वेळेचा सदुपयोग करून अभ्यास केल्यास विद्या किंवा यश संपादन करणे कठीण नाही असे विचार व्यक्त केले. डॉ. जवळी, डॉ. पुजार यांनी विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले. मागील शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थी- विद्यार्थींनींचा शालव स्मृतिचिन्ह देऊन पाहूण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय शारीरिक आणि सांस्कृतिक स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. जी. व्ही. जवळी, गणू कुलकर्णी, डॉ. बी.सी. पुजार, डॉ. एस. आर. बाबशेट, अमीन ताशेवाले, पी.के.पी.एस. कसमळगी, अध्यक्ष भिमाप्पा बोकडेकर, उपाध्यक्ष वाय. एन. पाटील, प्रा. मुल्ला, मुख्याध्यापक डॉ. शिंदगी, प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थ्यी – विद्यार्थींनी मोठ्या उपस्थित होते.
प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य एल पी पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. गीता गोडगेरी तर अहवाल वाचन प्रा. पुजा के. यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण प्रा. काळ्ळणावर यांनी केले तर प्रा. गणेश व प्रा. शोभा यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन प्रा. लक्ष्मी आंबोजी यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. भाग्यश्री पुजार यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *