Monday , September 21 2026
Breaking News

प्राथमिक ग्रामीण कृषी संघामुळे शेतकऱ्यांची प्रगती

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये जय गणेश विविधउद्देश संघाचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी संघांमुळे शेतकऱ्यांना गरजेनुसार पतपुरवठा होत आहे. त्यामुळे पिकासह खते, बी, बियाणे खरेदीसाठी हातभार मिळत आहे. दिलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड होत असल्याने कृषी संघांना जादा पतपुरवठा होत आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हातभार लागण्यासह त्यांची प्रगती होत आहे. प्रत्येक कृषी संघाने पारदर्शक कारभार करून शेतकरी आणि संघाची प्रगती साधावी, असे आवाहन सहकार रत्न उत्तम पाटील यांनी केले. येथील जय गणेश विविधउद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे शनिवारी (ता.२१) उद्घाटन करून ते बोलत होते. यावेळी नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामीजी आणि सदलगा येथील दरीखान आज्जा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सहकार रत्न उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
नांदणी मठाच्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी यांनी, सध्याच्या युगात पतसंस्था चालविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक कृषी संघ चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. दरीखान आज्जा, संघाचे संस्थापक अभयकुमार भूपाल मगदूम यांच्या हस्ते उत्तम पाटील यांचा तर उत्तम पाटील यांच्या हस्ते हस्ते संस्थेचे अध्यक्ष तेजपाल मगदूम यांच्यासह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना सभासद आणि ठेव पावतीचे वितरण करण्या तर इले.‌ कार्यक्रमास बोरगांव पट्टणपंचायत अध्यक्ष दिगंबर कांबळे, उपाध्यक्षा भारती वसवाडे संस्थेचे उपाध्यक्ष, प्रकाश चौगुले, संचालक आदिनाथ जंगटे, दादासाहेब हवले, विठ्ठल ऐदमाळे, उमर अपराज, गणेश वास्कर, उदय महाजन, त्रिशला बसन्नावर, दिलीप गोसावी, सायली बडीगेर, संघाचे सीईओ काडेश चनगौडनवर यांच्यासह संचालक, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *