Sunday , July 26 2026
Breaking News

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडोतर्फे ‘पेरेंट्स एंगेजमेंट’ कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘पेरेंट्स एंगेजमेंट’कार्यक्रम पार पडला. गेल्यासहा वर्षे पासून या शाळेत क्रीडो सोबत इतर कार्यक्रम होत असून यासाठी एक स्वतंत्र लॅब देखील उपलब्ध करण्यात आले आहे.
पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना क्रियाकल्प माध्यमातून शिकता यावे. त्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा, या उद्देशाने या लॅबचे आयोजन करण्यात आले आहे. इथे नर्सरी ते सीनियर के. जी. मधील सर्व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. याचे शाळेमार्फत आयोजित करण्यात आले होते सर्व पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. विविध मॉडेल्स मधून व क्रियाकल्प‌माध्यमातून त्यांनीपालक वर्गासमोर त्यांचे कौशल्ये सादर केले. त्यामध्ये गणित, इंग्रजी, समाज विज्ञान अशा विविध विषयांवर आधारित क्रियाकल्प माध्यमे विद्यार्थ्यांमार्फत सादर करण्यात आली.
यावेळी अंकुरम शाळेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले, प्राचार्या चेतना चौगुले, क्रीडो सदस्य आशिष माळी, विजय सर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. क्रेटरी डॉ.अमर चौगुले यांनी पालकांशी संवाद साधताना लहान मुलांचा आहार व त्यांचे निरोगी आरोग्य तसेच आजच्या युगातील स्पर्धात्मक आघाडी या विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पालकांनी उत्तम प्रतिसाद देत शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्राचार्या चेतना चौगुले यांच्यासह पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *