Tuesday , March 3 2026
Breaking News

मच्छे येथील संगोळी रायन्ना पुतळ्याचा अवमान नाही : RFSL अहवालातून स्पष्ट

Spread the love

 

बेळगाव : मच्छे येथील संगोळी रायन्ना पुतळ्यावर आढळलेल्या चिकट पदार्थाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (RFSL) अहवालात संबंधित नमुन्यांमध्ये वनस्पतीजन्य राळ (प्लांट रेजिन) असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुतळा, त्याच्या आसपासचा रस्ता तसेच जवळील झाडांच्या पानांवरून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आढळलेला पदार्थ झाडावरून खाली पडणारी चिकट राळ असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली असता कोणत्याही व्यक्तीने पुतळ्यावर काही फेकल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे ही घटना कोणत्याही समाजविघातक कृत्याशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अहवालानंतर पुतळ्यावर जाणूनबुजून काही पदार्थ फेकण्यात आल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *