Tuesday , March 3 2026
Breaking News

रणकुंडये गावच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (बेळगाव तालुका) रणकुंडये गावच्या हद्दीतील रस्त्यावरुन गोवा राज्यातील दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनावर अबकारी विभागाने धाड टाकून मोठा मद्यसाठा जप्त केला.
अबकारी अधिकाऱ्यांनी सीपीआय मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखालील गोवा राज्यातून दारुची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली.

सुमारे 3 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 205 लिटर गोवा बनावटीची दारु तसेच 25 लिटर हुर्राक (Urrak) चा समावेश आहे. कारवाई सुरु होताचं संशयित आरोपीने कार घटनास्थळीच सोडून पलायन केले. संबंधित कार जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढील तपास सुरु आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *