Monday , September 21 2026
Breaking News

मक्याच्या शेतात थरारक हत्या; मृतदेहाची विटंबना करून आरोपी फरार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील हिरेनंदीहळ्ळी गावात एकाचा गुप्तांग कापून अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी अज्ञाताचा मृतदेह गावाजवळील मक्याच्या शेतात आढळून आला होता. कलमेश कोटी (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी घडलेला हा खून उशिरा उघडकीस आला. हल्लेखोरांनी प्राणघातक शस्त्रांनी हत्या केली आणि विद्रुपीकरण केल्याचे उघड झाले आहे.

आरोपींनी मृतदेहाची विटंबना करत गुप्तांग कापून तेथून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. कलमेश हे तुमकूर येथे होम केअरमध्ये काम करत होते. दहा दिवसांपूर्वी ते गावी परतले होते. ते आपल्या वृद्ध आईसोबत राहत होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांना सोडून दिले होते.

आर्थिक व्यवहार, मालमत्ता व वैयक्तिक वादाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच पत्नी आणि मुलगा गावात परतले. शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *