Sunday , July 26 2026
Breaking News

श्री रामलिंग देवस्थान रामनगरचा वार्षिक जन्मोत्सव व रथ उत्सव उद्या

Spread the love

 

बेळगाव : सुपा तालुक्याचे आद्य ग्रामदैवत असलेल्या रामनगर मधील श्री रामलिंग देवस्थान चा वार्षिक जन्मोत्सव सोहळा रविवार दि. 15 ते गुरुवार दि. 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री रामलिंग देवस्थानच्या जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या दिवशी महापंचामृताभिषेक व मंगल आरती तसेच पालखी सेवा होणारच आहे.
सोमवार ते गुरुवार सर्व दिवस संध्याकाळी सात नंतर पालखी सेवा व हरिकीर्तन असा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दिनांक 20 रोजी 5 ते 7 पर्यंत हरिकीर्तन व रात्री 7 वाजता लहान रथोत्सव कार्यक्रम होणार असून रथ रामलिंग मंदिर ते हनुमान मंदिर असा ओढण्यात येणार आहे. शनिवार दि. 21 रोजी 6 ते 8 पर्यंत हरिकीर्तन व रात्री 8 वाजता मधला रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 22 रोजी सकाळी 11 वाजता होम हवन तर दुपारी 4 वाजता श्रींचे रथा रोहन होणार आहे. रात्री 9 ते 11.30 पर्यंत हरी किर्तन रात्री बारा वाजता ऑर्केस्ट्रा असा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दिनांक 23 रोजी दुपारी 4 वा. मुख्य रथोत्सवाला प्रारंभ होणार आहे. तर रात्री मराठी नाटक आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले असून गुरुवार दिनांक 26 रोजी उत्सवाची सांगता होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *