
बेळगाव : येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला 2024 साली 150 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव 26 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 रोजी माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा अहवाल प्रकाशन तसेच स्मरणिकेचा वितरण कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रावजी महादेव पाटील हे होते. विद्यार्थ्यांच्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. एसडीएमसी विद्यमान अध्यक्षा दिव्या संदिप कुंडेकर व माजी अध्यक्षा सौ. रुपा श्रीधर धामणेकर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन झाले. नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष एन. डी. गोरे आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर शाळेच्या वतीने शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष रावजी पाटील, निधी संकलन समितीचे अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, स्मारणिका समितीचे अध्यक्ष बी. बी. कानशिडे, प्रा. आनंद मेणसे, पत्रकार कृष्णा शहापूरकर, अशोक देसाई, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे सेक्रेटरी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेन्द्र चलवादी, शाळेचे सहशिक्षक श्री सातेरी पाखरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी प्राध्यापक आनंद मेणसे यांच्या हस्ते अहवालाचे प्रकाशन तसेच स्मरणिकेचे वितरण करण्यात आले. यानंतर शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. आर. एम. चलवादी यांनी अहवाल वाचन केले. प्राध्यापक आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, एन्. डी. गोरे, आनंद पाटील यांनी आपले मनोगत केले. बी. बी. कानशिडे यांनी प्रास्ताविकेतून या महोत्सवानिमित्त ठरविण्यात आलेले संकल्प याबद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये रावजी पाटील यांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या देणगीदारांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार मानले. या सोहळ्याला एसडीएमसी उपाध्यक्ष जोतिबा उडडेकर, सदस्य मूर्तिकुमार माने, मारुती यळगुकर, दिनेश लोहार, जोतिबा पाटील, सदस्या, सौ. अलका कुंडेकर, सौ.मयुरी कुगजी, सौ.रेश्मा काकतकर, सौ.राजश्री सुतार, श्रीमती शुभांगी मुतगेकर, सौ.अर्चना देसाई, सौ.ज्योति पाटील, शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे सदस्य सर्वश्री शिवाजी नांदुरकर, नारायण बस्तवाडकर, दशरथ पाटील, अशोकराव विठ्ठलराव देसाई, सुनील हलगेकर, शंकर टक्केकर, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. अतिथींचे स्वागत आणि सत्कार श्रीमती एस् आर निलजकर, सूत्रसंचालन एस बी पाखरे तर आभार सी एम कर्लेकर यांनी मांडले. अहवाल व स्मरणिका शाळेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. देणगीदार व इतर शिक्षण प्रेमींनी शाळेला भेट देऊन अहवाल व स्मरणिका स्वीकारण्याचे आवाहन शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने यावेळी करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta