Monday , June 1 2026
Breaking News

वस्त्रोद्योग पार्कमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

Spread the love

 

बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे ; बोरगाव मधील बैठकीत मागणी

निपाणी (वार्ता) : कर्नाटक सीमा भागातील वस्त्रोद्योगाला चालना मिळावी. होतकरू व्यवसायिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राज्य वस्त्रोद्योग खात्यातर्फे बोरगाव येथे ७५ एकरमध्ये वस्त्रोद्योग पार्क निर्माण केले आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून बोगस कागदपत्रे दाखवून सबसिडी लाटली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असून लवकरच आपण वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांची भेट घेणार आहोत. यामध्ये बडे दोषी अधिकारी व मध्यस्थ अडचणीत येणार असल्याची माहिती बुडा अध्यक्ष व चिक्कोडी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. बोरगाव येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
चिंगळे, म्हणाले, पार्कमध्ये १३६ युनिट कार्यरत असल्याचे दाखविले आहे. पण प्रत्यक्षात १०० युनिट बंद आहेत. महाराष्ट्र राज्यातील लाभार्थ्यांनी बोगस शिधापत्रिका, आधार कार्ड,जीएसटी बिल, व बोगस कागदपत्रे दाखवून शासनाचा निधी लाटला आहे. त्यासाठी बेळगावातील वस्त्रोद्योग अधिकारी व येथील एका मध्यस्थीच्या सहाय्याने सरकारच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या दरोडे टाकण्यात आला आहे. एका युनिट साठी ५ कोटींचे निधी मंजूर होते. याबाबत कुठल्याही अधिकाऱ्यांनी ‌पाहणी केलेली नाही. बोगस साहित्य, जीएसटी बिल, व बोगस कागदपत्रे दाखवून सरकारला फसवण्यात आले आहे. एका मध्यस्थीने याप्रकरणी मोठा भ्रष्टाचार करून शेकडो एकर जमीन व संपत्ती जमविली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चिंगळे यांनी सांगितले.
काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी, २००८ मध्ये सरकारकडून उभारण्यात आलेल्या या पार्कमध्ये अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार होती. मात्र सबसिडीच्या नावाखाली सरकारचे पैसे लाटण्यात आले आहेत. मध्यस्थीनी घेतलेल्या रकमेची चौकशी करण्याची मागणी केली. बैठकीस माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार-वडर, अनुज हावले, नगरसेवक रोहित पाटील, विद्याधर अम्मन्नावर, शिवाप्पा माळगे, भाऊसाब पाटील, विजयकुमार शिंगे, अण्णासाब बारवाडे, मारुती निकम, बाळासाहेब सातपुते, सुरेंद्र पाटील, बाळासाहेब बसन्नावर, अण्णासाहेब मालगावे, रामचंद्र फिरगणन्नावर, शिशिर सातपुते, सिद्धार्थ हावले उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *