Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध : राज्यपाल आचार्य देवव्रत

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत असताना म्हणाले की, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे  मराठी भाषिकांचे हित जपण्याचा महाराष्ट्र सरकारचा नेहमीच प्रयत्न असून महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या अभिवाचनात सांगितले.

महाराष्ट्र सरकारचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबईत पार पडत आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणारम्यान बोलताना दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार मराठी भाषिकांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांचे हित जपणे आणि कायदेशीर मार्गाने हा सीमावाद सोडवून घेणे ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे.

सीमा भागातील नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने विविध कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *