Monday , September 21 2026
Breaking News

मराठी सन्मान यात्रेला नंदकुमार गोरुले यांची येळ्ळूर येथे सभा

Spread the love

 

बेळगाव : येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी सन्मान यात्रा राजहंसगड येथून दुपारी 3 वाजता निघणार आहे,

ही मराठी सन्मान यात्रा राजहंसगड, सुळगे (ये) येळ्ळूर वरून अवचारहट्टी, मार्गे धामणे आणि पुन्हा त्याच मार्गे धामण्याहुन येळ्ळूर गावात फेरी होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी 7.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.

या सीमावासीयांच्या सभेला शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे यांची 12 वर्षे निष्ठेने सेवा केलेले शिवसैनिक नंदकुमार गोरुले हे संबोधित करणार आहेत. नंदकुमार गोरुले हे गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथील मूळचे रहिवाशी असून महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, दिग्दर्शक, कवी व कलाकार असून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. आनंद दिघे यांच्या जीवनावर धर्मवीर या चित्रपटाच्या चित्रीकरनावेळी अभिनेते प्रसाद ओक यांनी नंदकुमार गोरुले यांच्याकडूनच आनंद दिघे यांची बरीचशी माहिती मिळवली होती, तसा उल्लेखही प्रसाद ओक यांनी आपल्या मुलाखतीत केला होता.

स्वर्गीय आनंद दिघे यांच्याशी 12 वर्षे घनिष्ठ व निष्ठावंत संबंध निर्माण केलेले नंदकुमार गोरुले हे बेळगावच्या जवळच असलेल्या गडहिंग्लजचेच असल्याने बेळगाव व येथील मराठी माणसांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध आहेत. गोरुले यांचे संबोधन ऐकण्यासाठी सीमावसीयांनी या सभेला बहूसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *