Tuesday , March 3 2026
Breaking News

कावळेवाडी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण मूहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात संपन्न

Spread the love

 

कावळेवाडी…. येथील भजनी मंडळ व ज्ञानेश्वर पारायण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पाच मार्चला तुकाराम बीज दिवशी गावात पारायण उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मूहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर उपस्थित होते. मूहूर्त‌मेढचे विधिवत पूजन समाजसेविका आरती भंडारे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षा रेखा नाईक, संदीप अष्टेकर, बबलू नावगेकर, सौ. शीतल तारीहाळकर, सागर नाईक, शांता सामंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दरवर्षी किर्तन प्रवचन गोपाळ काला, दीपोत्सव अशा अध्यात्मिक कार्यक्रमातून होत असतो. गावात उत्साहाचे वातावरण असते.
याप्रसंगी सौ. आरती भंडारे यांनी कर्म करा, प्लास्टिक मुक्त गाव बनवा, झाडं लावून संगोपन करा, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. कर्मकांड करु नका अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी पुढे या तुम्ही करीत असलेल्या कार्यात देव आहे. संतानी आपल्या विचारांचा ठेवा अभंगातून सांगितला आहे, असे मौलिक विचार व्यक्त केले.
यावेळी महात्मा गांधी सामाजिक संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी वारकरी संप्रदाय हा अठरा पगड जातींना भक्तीचा संदेश देत आहे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, सावता माळी, संत गोरा कुंभार, बंका महार, रोहिदास चांभार, कान्होपात्रा जनाबाई अशा संतांनी समाजात आनंद पेरला. भक्तीची कवाडं खुली केली. विठ्ठलाची उपासना करुन अवघाची संसार सुखाचा करीन. असे अध्यात्मिक, पारमार्थिक उद्बोधन संतांनी आपल्या आचरणातून जगाला दाखवून दिले, असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाची सुरुवात मूहूर्तमेढची गावातून टाळ, मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प, श्रीफळ, पानविडा देऊन स्वागत केले.
हभप मारुती बाचीकर, जोतिबा मोरे, एम. पी. मोरे, लक्ष्मण जाधव, भावकाणा गावडा, संजय ओऊळकर, नारायण गुंडू मोरे, भरमाणा मोरे, यशवंतराव मोरे, काशिनाथ मोरे, हभप गंगुबाई य. मोरे, आशा बाचीकर, अनिता बाचीकर, कृष्णाबाई मोरे, जिजाबाई कणबरकर, चुडापा यळूरकर, सौ. यल्लुबाई ल. जाधव मारुती मोरे आदी माळकरी उपस्थित होते
यावेळी महात्मा गांधी सामाजिक संस्थेने ₹ २५००/-, मनोहर बेळगावकर ₹२०००/-, महेश पाटील ₹११००/-, संदीप अष्टेकर ₹११००/-, रेखा नाईक १०००/-, बबलू नावगेकर ५००/-, यशवंत मोरे ५००/- आदीकडूंन आर्थिक सहकार्य मिळाले.
पारायण सोहळ्याचे सलग २७ वर्षे या भक्तीचा जागर केला जातो आहे. सूत्रसंचालन कोमल गावडे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *