Sunday , September 20 2026
Breaking News

तारांगण व मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन

Spread the love

 

बेळगाव : साहित्यिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या तारांगण व नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने मराठी व कन्नड अशा द्विभाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजता कॅन्टोन्मेंट स्कूल सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष गोव्याच्या चित्रा क्षीरसागर या भूषवणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून गोवा येथील शासकीय महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य कृष्णा बडीगेर व नागप्पा मिसाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश मिसाळे आहेत. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मिसाळे प्रतिष्ठानचे विश्वस्त विष्णुपंत मिसाळे, कृष्णा मिसाळे, डॉक्टर डी एन मिसाळे, ज्येष्ठ साहित्यिक श्री. गुणवंत पाटील, विजयकुमार दळवी उपस्थित राहणार आहेत. बेळगाव सीमा भागातील नवोदित कवींना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कन्नड व मराठी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. या कवी संमेलनाला साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.

चित्रा क्षीरसागर परिचय खालील प्रमाणे

चित्रा क्षीरसागर या साहित्यिका, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्यांचे कवितेचे झाड, पाच ललित संग्रह व तीन पुस्तके संपादित केली आहेत. गोमंतकीय स्त्रीलिखित मराठी कविता या पुस्तकाला चार पुरस्कार मिळाले आहेत. गोवा विधानसभेत या पुस्तकाच्या अभिनंदनाच ठराव संमत करण्यात आला. कोकण मराठी परिषदेच्या त्या सचिव आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्या कार्यरत असून त्यांनी १७० बचतगटांची स्थापना केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *