Friday , April 17 2026
Breaking News

भाजप नेते प्रमोद कोचेरी यांची भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड

Spread the love

 

खानापूर : निस्वार्थी भावनेने तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणतेही पद नसताना विशेष प्रयत्न करणारे नेते म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष आणि खानापूर भाजपमधील ज्येष्ठ नेते कार्यसम्राट प्रमोद कोचेरी यांची भाजप पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी पक्षासाठी दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण केलेल्या कार्याची दखल घेत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. हे पद म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान ठरला आहे.

आजपर्यंत त्यांनी गोरगरिबांनी सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या सामान्य नागरिकांच्या सरकारी कार्यालयातील अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी त्यांनी पाठपुरवठा करून विविध शासकीय विभागाशी संपर्क साधून विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निस्वार्थ आणि प्रामाणिक कार्याची दखल यापूर्वी देखील पक्षाने घेतली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रमोद कोचेरी त्यांच्यावर पक्षाने दिली होती. या कार्यकाळात प्रमोद कोचेरी यांनी तालुक्यातील गाव खेड्यात जाऊन पक्ष संघटना मजबूत केली. ते एक कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे खानापूर तालुक्यात दोन वेळा भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले. सध्या देखील ते बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत आहेत. दिवंगत खासदार तथा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश अंगडी हे जिल्हाध्यक्ष असताना प्रमोद कोचेरी यांनी जिल्हा सचिव म्हणून काम केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांची चांगली ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी खासदार निधी, आमदार निधी, एमएलसी फंड आदींच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकास कामे राबविली आहेत. वेळोवेळी आमदार, खासदार यांच्या सहकार्याने तालुक्यात अनेक विकास कामांसाठी अनुदान मंजूर करून घेण्यात प्रमोद कोचेरी यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना बस सेवा उपलब्ध करून देणे, रस्त्यांची दुरुस्ती, तालुक्यातील रेल्वे समस्या, विविध शासकीय प्रश्न आदी मुद्द्यांवर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून तालुक्यातील समस्यांचे निवारण केले. त्यामुळे तालुक्यातील सामान्य नागरिक कोणतीही समस्या उद्भवल्यास प्रमोद कोचेरी यांच्याकडेच येत असतात. राजकारणात कोणतेही मोठे पद नसताना लोकप्रतिनिधीप्रमाणे काम करत असल्याची भावना तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने प्रमोद कोचेरी यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्त्यातून त्याचप्रमाणे भाजप पदाधिकाऱ्यातून व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *